Uncategorized

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७३७ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी होणार

परंडा ( सुरेश बागडे ) दि. ०२

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७३७ व्या पुण्यतिथी निमित्त बुधवार (दि.८) रोजी सराफ व सुवर्णकार संघटनेच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे.

सालाबाद प्रमाणे यावर्षी शहरातील प्रसिध्द सराफ व्यापारी मनोज चिंतामणी यांच्या “मातोश्री” निवासस्थानी सोनार समाजातील थोर संत श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे.पुण्यतिथी निमित्त बुधवारी सकाळी १० ते १२ या वेळेत भागवताचार्य हभप दत्तात्रय हुके महाराज साकतकर यांचे गुलालाचे किर्तन होणार आहे.दुपारी १२ वाजता गुलालपुष्प उधळन होणार असुन त्यानंतर भाविका साठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आला आहे.सराफ व सुवर्णकार संघटनेच्या वतीने मागील वर्षी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी नराहरी महाराजांचे भव्य दिव्य अशा मंदिराची उभारणीचा संकल्प करण्यात आला होता.भव्य मंदिरासाठी सोनार समाज व संघटनेच्या वतीने परंडा ते बार्शी मार्गावर सीना-कोळेगाव वसाहती समोर ९ में २०२२ रोजी पावणे तीन गुंठे जमीन खरेदी करण्यात आली आहे.सदरील मंदिरासाठी ट्रस्टची निर्मिती करण्यात आली असुन त्यानुसार रितसर नोंदणीसाठी धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयात संचिका दाखल करण्यात आली असुन भव्य दिव्य मंदिराची उभारणी लवकरच साकार होणार आहे. श्रीसंत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमास पंचक्रोशी व परिसरातील भाविक भक्तानी सहभागी होऊन सदरील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन परंडा सराफ व सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश बागडे, उपाध्यक्ष सागर लंगोंटे, सचिव शिवाजी जोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!