Uncategorized

वीज कामगारांचा खाजगीकरणा विरुद्ध ७२ तासाचा संप

वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते संपात सहभागी, बाह्य स्त्रोत कंत्राटी कर्मचारी संघटनांचे समर्थन..
महादेव हरणे
वाशिम:- वीज क्षेत्रात खाजगीकरण करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात वीज कर्मचारी अधिकारी अभियंते संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 3/.1/.2023 च्या मध्यरात्रीपासून ७२ तासांचा संप पुकारला आहे ज्यामध्ये स्थानिक वाशिम मधील सर्व संघटना सामील आहेत.
संघर्ष समितीने दिनांक 12/12/.2022 पासून क्रमबंद आंदोलनास सुरुवात केली. सदर खाजगीकरण विरुद्ध महारष्ट्रभर द्वार सभा, विधान भवन नागपूर येथे दिनांक 23 /12 /2022 रोजी विराट मोर्चाद्वारे प्रदर्शन करून शासनाकडे या निर्णयाचा निषेध नोंदविला. परंतु शासनाकडून निर्णय बदलणे किंवा खाजगीकरणाचा परवाना रद्द करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याने क्रमबंध आंदोलनाचा भाग असलेला ७२ तासांचा संप पुकारण्यात आला आहे.
महावितरण चा नफ्याचा भाग असलेला मुंबई, ठाणे क्षेतत्रामध्ये समांतर वीज वितरण परवाना अदानी पावर ला देण्याचा घाट राज्य शासनाने घातलेला आहे. तसेच महानिर्मितीमधील जलविद्युत केंद्र सुधारणेच्या नावाखाली खाजगीकरणा करिता काढण्यात आलेले आहेत. वर्षानुवर्षे कंत्राटी कामगार म्हणून काम करत असलेल्या कामगारांना कायम रोजगाराची कोणतीही संधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत नाही आहे त्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये सुद्धा शासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
सदर खाजगीकरणाची झळ ही वीज ग्राहकांना सुद्धा बसणार आहे. महावितरण कंपनी ही ना नफा न तोटा या तत्त्वावर जनतेची निरंतर सेवा करून जमा झालेल्या महसुलातून नवीन विद्युत संच उभारणी उपकेंद्र निर्माण करणे व वाहिनी निर्माण करणे इत्यादी कामे करत असते. तेव्हा अशा ठिकाणी कोणतीही खाजगी कंपनी ग्राहकांना ही सेवा पुरविणार नाही. पर्यायाने ग्राहकांवर याचा भार पडल्याशिवाय राहणार नाही. शेतीपंप ग्राहकास जी सवलतीच्या दरात वीज पुरवठा होतो तो होणार नाही. तेव्हा खाजगीकरण किती धोक्याची आहे हे यावरून स्पष्ट होते.
खाजगीकरणामुळे भांडवलदारांना शासनाकडून समांतर परवन्याचा रस्ता मोकळा झाला आहे. अशा प्रकारे सार्वजनिक उद्योग व शासकीय संसाधने भांडवलदाराच्या घशात जाऊ नये याकरिता वीज कर्मचारी अधिकारी अभियंते संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांनी संप काळात ग्राहकांचे समर्थन मिळावे याकरिता आव्हान केले आहे. सदर खाजगीकरणा विरुद्ध स्थानिक सर्व संघटना सहभागी आहेत सदर संप यशस्वी करण्याकरिता वाशिम येथील अधिकारी संघटनेचे कुणाल गजभिये, एस ई ए संघटनेचे – पि के चव्हाण, एस एस जयपुरकर, तांत्रिक कामगार युनियन 5059 चे शेख अनवर, विवेक बोरकर, गणेश पोधाड़े, वीज तांत्रिक कामगार युनियनचे शिरीष इंगोले, रवी लोलुरे वि क्षे ता का युनियनचे गणेश गंगावणे, योगेश उलेमाले, मागासवर्गीय कामगार युनियनचे प्रशांत भगत, संतोष इंगोले, स्वाभिमानी वर्कर्स फेडरेशनचे बालाजी गटलेवार, रवी आवटे, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स युनियनचे जीव्ही-भारस्कर, गणेश घुगे, मरा वीज कामगार महासंघाचे अभिजीत जोशी , स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी महासंघ यांचे पदाधिकारी पंकज माळी, तसेच कंत्राटी कामगार संघटनेचे शेख राहील, अतुल थेर, श्याम भारती प्रसाद राजे, गोपाल टंचर इत्यादींनी आव्हान केले आहे. या संपामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी स्वयंस्पृतिने संपामध्ये सामील झाले आहे. अशी माहिती वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती वाशिम यांनी दिली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!