Uncategorized

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जनजागृती मोहीम

मेडशी:- राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकटराव मिठठेवाड यांच्या मार्गदर्शनामधे रस्ता सुरक्षा सप्ताह मोहीम राबविण्यात आली नवीन वर्षाचे औचित्य साधून दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो याचा प्रमुख उद्देश रस्ता अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी करणे , वाहन चालवत असतांना मोटार नियम पाडणे असा असून सद्ध्या लोकांच्या गरजेनुसार मोटार वाहनांची संख्या वाढत आहे आणि लोकांचा रस्ता रहदारीचा हस्तक्षेप वाढत आहे रस्ता अपघाताचे प्रमुख कारण अति वेगाने वाहन चालविणे आणि मोटर वाहन नियंत्रणाविषयी अज्ञान असणे तसेच आपल्या वाहनाच्या योग्य देखभालीकडे दुर्लक्ष करणे आजच्या तरुण वर्ग रस्ता रहदारीच्या दोन पाच मिनिटांची घाई करून रस्ता अपघाताच्या घटना बडी पडतो आणि आपले मौलिक आयुष्य गमावून बसतो अशा प्रकारच्या घटनेने कुटुंबावर आघात होतात त्याचबरोबर समाज व्यवस्थेत देखील नुकसान होते याकरिता सार्वजनिक रहदारीत रस्ता सुरक्षाचे महत्व सर्वांना कडले पाहिजे अशी माहिती कार्यकारी अभियंता मिठठेवाड यांनी दिली त्याचबरोबर सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनात मालेगाव व रिसोड येथे उपविभागीय अभियंता धायगुडे, मंगरूळपीर येथे उपविभागीय अभियंता काळे ,कारंजा येथे उपअभियंता जोशी ,मानोरा येथे उपअभियंता खोडे,वाशिम येथे घिन्मीने यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह विषयी जनजागृती मोहीमेमधे साइन बोर्ड व माहिती बोर्ड वाहतूक साधनांची दुरुस्ती बद्दल माहिती झेब्रा क्रॉसिंग बद्दल माहिती व प्रवासी मार्गदर्शक बोर्ड लावण्यात आले रस्ता दुरुस्तीचे ठिकाण सावधानतेचा विषयी व उपाययोजना नागरिकांना समजून सांगण्यात आले व वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले

Related Articles

Back to top button
Don`t copy text!