४८ ग्रामपंचायत च्या सरपंचाची निवड, १ पद रिक्त तर ३ अविरोध..
वाशिम :- मालेगाव तालुक्यातील४८ ग्राम पंचायत च्या सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांच्या निवडणूकीचा निकाल आज ता २० रोजी जाहीर करण्यात आले. एस टी उमेदवार नसल्याने वाघळूदच सरपंचपदं रिक्त राहणार आहे तिथे एस टी नागरिक वास्तव्यास नाहीत त्यामुळे मतदारही नाहीत.
वडप कुरळा व एरंडा येथिल सरपंच पदाची अविरोध निवडणूक अविरोध पार पडली होती वडप च्या सरपंच पदी यमुनाबाई सखाराम व्यवहारे , एरंडाच्या सरपंच पदी सुरेश आनंदराव घुगे तर कुरळा च्या सरपंच पदी वच्छलाबाई आत्माराम करवते ह्या अविरोध सरपंच झाल्या आहेत.
मालेगाव तालुक्यातील सरपंच पदाचे विजयी उमेदवारा मध्ये अमानी- अनिल दत्तात्रय जाधव ,भेरा- सुनीता आनंदा वानखेडे ,डव्हा- कमल अर्जुन इंगळे , झोडगा बु- कैलास देवराव ढेंगे नागरदास- अश्विनी अभिषेक देवळे ,पांगराबंदी- पार्वतीबाई प्रल्हाद सांगळे ब्राह्मणवाडा- गोपीनाथ शिवाजी नागरे, रिधोरा- वच्छलाबाई बबन खुळे ,कोल्ही बोर्डी- तुळशीराम रामकिसन चव्हाण , बोरगाव- गिताबाई विकास लांडकर , सुकांडा- नंदा चंद्रकांत घुगे , कुरळा – वच्छलाबाई आत्माराम करवते ,देवठाणा- सिद्धार्थ गोवर्धन इंगळे ,उडी -प्रमीला बबन कांबळे , सुदी-प्रतिभा संदीप चव्हाण , मसलाखुर्द-अनिल बबन जोगदंड , शेलगाव बोंदाडे- यमुना बाई नामदेव इगोले , चांडस- पुष्पा संजय सोमाणी , मैराळडोह- बबन कुडलीक सरदार , पांगरी धनकुटे- सेवाराम भोपा चव्हाण , खंडाळा शिंदे-अनिल विठ्ठलराव शिंदे , किन्ही घोडमोड-सुनिल भास्कर घोडमोडे , दुधाळा-अनील मधुकर खडसे ,पांगरखेडा/घाटा-नंदाबाई प्रकाश सोमटकर ,वाडी रामराव -सत्यशिला महेश काळुशे , कवरदरी-देवानंद नामदेव मैघने ,बोराळा न.कार्ली-सिमा कैलास वानखडे , माळेगांव -स्वाती महादेव सरोदे , भौरद-बेबी गजानन गाडे , सोमठाणा-लता पंढरी खंडारे , तरोडी भास्कर आनंदा भिलंग , कोळगाव/धारपिप्री-विठ्ठल किसन धंदरे , हनवतखेडा- कलावती लक्ष्मण तिवाले , जामखेड -करुणा बाळु पोफळे , पिपळा-राधाबाई संतोष ढंगारे ,आमखेडा- सुभद्राबाई प्रल्हाद जोगदंड , कोठा-रत्नाबाई मदन इंगळे ,वाघीबू.- तेजराव ज्ञानबा वाघ ,शेलगाव बगाडे-छाया राजेश इंगोले यांचा समावेश आहे, वाघळुद..ग्राम पंचायत सरपंच पदासाठी एस टी उमेदवार नसल्याने पद रिक्त राहिलं आहे
ग्राम पंचायत सरपंच पदासाठी ईरळा-नलीनी प्रशांत ठाकरे वडप-यमुनाबाई सखाराम व्यवहारे एरंडा-सुरेश आनंदराव घुगे (अविरोध) केळी-किरण प्रविण घुगे
दुबळवेल – चंद्रकांत सुभाष देवढे , सोनाळा -शालिनी राहुल वानखेडे विजयी झाले आहेत.
तहसील कार्यालयांच्या नियोजनाच्या अभावामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथ गतीने झाली त्यामुळेअनेक उमेदवार व त्यांच्या समर्थकांना दुपारी 3.45 वाजेपर्यंत ताटकळत राहावे लागले निवडणूक निकालाची ध्वनिक्षेपकावरून घोषणा न केल्याने निवडणूक निकालाबाबत उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये घालमेल दिसून आली त्यावर उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली निवडणूक निकालाची माहिती वृत्तपत्रांच्या प्रतिनिधी ना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळे तहसील कार्यालयातुन बाहेर पडणाऱ्या उमेदवारा कडून माहिती गोळा करावी लागली त्यामुळे त्यांनी तहसील च्या कार्यप्रणाली वर रोष व्यक्त केला अंतिम वेळी सोनाळा च्या सरपंच पदाच्या निकालाची माहिती चुकीची दिल्याने मतमोजणी केंद्राच्या प्रवेशद्वारावर गोंधळ निर्माण झाला होता.

