Uncategorized

सावकारच्या त्रासाला कंटाळून तरूणाचा विषारी औषध पिऊन आत्महत्याचा प्रयत्न

परंडा तालूक्यातील सोनारी येथिल घटणा तालूक्यात खळबळ

शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी रूग्णालयात जाऊन गणेश कुळधर्मेची घेतली भेट

परंडा ( सुरेश बागडे ) दि. १९

सावकारच्या त्रासाळा कंटाळून दिलेली जमीन परत मिळत नसल्याने निराश झालेल्या परंडा तालूक्यातील सोनारी येथिल शेतकरी गणेश नागेश कुळधर्मे वय
२५ यांनी विषारी औषध पिऊन जिवन संपवण्याचा प्रयत्न केला हि घटणा दि १९ डिसेंबर रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास घडली .

गणेश याने विषारी औषध पिल्याने त्यास तत्काळ उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमीक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारा साठी पाठवण्यात आले .

गणेश कुळधर्मे यांनी सोनारी येथिल सावकार आण्णा प्रभू राऊत यांच्या कडून सन २०१७ साली व्याजाने ४ लाख रुपये घेतले होते त्या पोटी १ एक्कर जमीन खरीदी देऊन पैश्याची परत फेड केल्यावर जमीन परत देण्याचे ठरले होते .

जमीन परत देण्याची मागणी गणेश कुळधर्म यांनी केली मात्र दोन वर्षा पासुन जमीन परत देण्यास सावकार टाळाटाळ करीत असल्याने गणेश कुळधर्मे यांनी दि १८ डिसेंबर रोजी परंडा पोलिसात सावकार आण्णा राऊत यांच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी आले होते .

जमीन परत मिळत नसल्याने निराश झालेल्या गणेश कुळधर्मे सोनारी येथे जाऊन विषारी औषध पिऊन जिवन संपवण्याचा प्रयत्न केला अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे .

परंडा तालूक्यात अवैध सावकारांचा सुळसुळात वाढला असुन सावकारांना कायद्याचा धाक राहिला नाही .
परंडा तालूक्यातील अनेक सावकारा विरूध्द परंडा येथिल सहाय्यक निबंधक यांच्या कडे तक्रारी दाखल आहेत मात्र वर्षा नंतर ही कारवाई होत नाही .
या मुळे शेतकरी आत्महत्या चा मार्ग अवलंब करीत आहे .

या साठी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या आधिकारी यांच्या कडून विलंब का होत आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जनतेतून होत आहे .

Related Articles

Back to top button
Don`t copy text!