परंडा बस स्थानक स्थलांतर पालक मंत्री सावंत यांच्या निर्णयाच्या निषेधार्थ परंडा बंद ला उत्स्फुर्त प्रतिसाद ,

व्यापारी वर्गाच्या मागणीला माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा पाठींबा ,
परंडा ( सुरेश बागडे )दि. ०३
शहरातील बस स्थानक स्थळांतराच्या पालक मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या निर्णयाच्या निषेधार्थ शनिवार दि ३ डिसेंबर रोजी शहरातील सर्व व्यापारी वर्गाच्या वतीने परंडा बंद ठेवण्यात आला शहर बंद ला अत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे .
व्यापारी वर्गाच्या मागणीला माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील , यांच्या सह कॉग्रेस , भाजप , राष्ट्रवादी वंचीत बहुजन अघाडी,आरपीआय,एमआय एम यांनी पाठींबा दिला आहे .
दुपारी ४ वाजता मंडई पेठ येथून शहरातील सर्व व्यापारी वर्गाने एकत्रीत येत तहसिलदार यांना मागणीचे निवेदन दिले .
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी बस स्थानक स्थलांतराचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे .
सध्या असलेले बसस्थानक शहराच्या मध्यवर्ती भागात असुन शहरातील नागरीकांच्या सोयीचे आहे तालूक्याची आर्थीक नाडी असलेल्या एसबी आय बॅक , पोस्ट ऑफीस , सराफ बाजार , कापड व्यापार , किराणा व्यापार , स्टेशनरी व्यापार , हॉटेल , फ्रुट मार्केट , टेलरींग या सह विविध वस्तुची मोठी बाजार पेठ आहे .
ग्रामीण भागातून येनाऱ्या जनतेला बस स्थानक सोयीचे ठिकाण आहे बस स्थानक स्थलांतर झाल्यास याचा मोठा फटका उद्योग धंद्यावर पडणार असुन मंडई परिसरातील बाजारपेठ उध्वस्त होईल व मोठे नुकसान होईल .
या साठी बसस्थानक स्थलांतर करू नये अशी मागणी करण्यात आली आहे .
यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी व्यापारी वर्गाला पाठींबा देऊन आमचा विकास कामाला विरोध नाही मात्र जनतेचे हित बघून निर्णय घ्यावे असे सांगितले .
परंडा बस अगाराला ४२ एस टी बस असुन परंडा बस स्थानका मधून ७४ फेऱ्या होत आहेत .
परंडा अगारात चालक ७८ तर वाहक ७१ कार्यरत आहे , चालकाच्या २० तर वाहकाच्या २७ जागा रिक्त आहे .
परंडा बस स्थानकातून पुणे ८ फेऱ्या , औरंगाबाद १ फेरी , सोलापूर ८ फेऱ्या , उस्मानाबाद १२ फेऱ्या ,कळंब १ फेरी , लातूर १ फेरी सुरु आहे
तर तुळजापुर व भुम साठी एकही बसची फेरी होत नाही तर कुर्डवाडी साठी दुपार २ नंतर एकही बसची फेरी नसल्याने मुंबई , पुणे येथून आलेल्या प्रवाश्यांची मोठी गैर सोय होत आहे .
बसस्थानक स्थलांतर विरोधात परंडा शहरातील मंडई पेठेतील मुख्य बाजार पेठ , टिपू सुलतान चौक , छत्रपती शिवाजी चौक , डॉ आंबेडकर , बावची चौक , मंगळवार पेठ , करमाळा रोड बार्शी रोड सह संपुर्ण दुकाने कडेकोट बंद होते .
तहसिलदार यांना मागणीचे निवेदन देताना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील , मेघराज पाटील , Adv नुरोद्दीन चौधरी , शब्बीर पठाण , एम आयएमचे जमील पठाण, हारूण पठाण , बाशा शाहाबर्फीवाले , समीर पठाण , सत्तार पठाण इरफान शेख , जावेद पठाण , दस्तगीर शेख ,
किराणा, कापड व रेडीमेड, स्टेशनरी, सराफा बाजार, इलेक्ट्रॉनिक्स, शु मार्ट, अशा विविध संघटनेचे वाजीद दखणी, हनुमंत विटकर, तनविर डोंगरे, राजु डोंगरे, सुयोग शहा, राज शेख, नितिन विटकर, जवाहर परांडकर, जितेंद्र हरियाणी, नुसरत करपुडे, मन्सुर बहिरे, इलाही पठाण, अरूण ठक्कर, पंकज नांगरे, महाविर रोकडे संतोष बेदमुथा, धन्यकुमार मोदी ,मकसुद विजापूरे , संतोष भालेकर , कादर हान्नुरे , सत्तार पठाण यांच्या सह शेकडो व्यापारी उपस्थित होते.