Uncategorized

Duplicate CM : आपणच मुख्यमंत्री असल्याची बनवेगिरी ! , तोतया मुख्यमंत्री विजय माने विरोधात गुन्हा दाखल

तोतया सीएम विजय माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप माने याच्यावर करण्यात आला आहे.

पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या सारखी वेशभुषा करून करून तसा फोटो सोशल माध्यमातून व्हायरल करणाऱ्या तोतयावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  विजय नंदकुमार माने (रा. आंबेगाव) असे तोतयागिरी करणाऱ्याचे नाव आहे.  त्याने सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्या सोबत फोटो काढून ते व्हायरल केले होते.  अशा प्रकारचे कृत्य करणार्‍या इतरांविरूध्द देखील गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे.

याबाबत खंडणी व पथक दोनचे पोलीस उपनिरीक्षक मोहनदास आप्पासाहेब जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय नंदकुमार माने याच्यावर भादंसं ४१९-५११,४६९,५००,५०१, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभुषा व पोषाख परिधान करणारा विजय माने याने सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्या सोबत फोटो काढून तो सोशल मीडियामध्ये व्हायरल केला आहे. तसेच समाजमाध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आपण आहोत अशी तोतयागिरी करत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने व्हॉट्सअॅप व फेसबुक या सोशल मीडियाद्वारे माहिती घेत असताना पोलिसांना एक फोटो मिळाला. फोटो पाहिल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसल्याचे दिसत आहे. आरोपी विजय माने हा नियमित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभुषा व पोशाख करुन समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा अशा पद्धतीने वावरत होता. आरोपीने जाणीवपूर्वक नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी तोतयागिरी करुन ठकवण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!