5 दरोडेखोरांच्या रिसोड पोलिसांनी आवळल्या मुसक्या .
दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही जप्त
: रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत मालमत्तेचे गुन्हे घडु नयेत म्हणून शहर व ग्रामीण भागात चार वाहनाद्वारे रात्रीची पेट्रोलिंग करण्यात येते.
दि.12/09/22 रोजी पहाटे 02.00 वा. रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान वाशिम- बुलढाणा जिल्ह्याचे हद्दीवर रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोहवा. एकाडे यांना मिळाली. या या माहितीवरून पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांनी तात्काळ भापूर शिवारात शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान भापूर गावाच्या शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले 6 इसम वाहनासह संशयास्पद स्थितीत दिसून आले. पोलिसांना पाहून सदर दरोडेखोर पळून जात असताना त्यांचा पाठलाग करुन पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून एक चाकू, लोखंडी तलवार, दोरी, दोन लोखंडी पाईप, मिरची पूड व एक तवेरा वाहन मिळून आले. एक आरोपी अंधारात पळून गेला, तर पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींवर वाशिम, मेहकर, डोणगाव, जानेफळ पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असुन ते सराईत गुन्हेगार आहेत. सदर आरोपीवर भादवी कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा.बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक श्री.गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सपोनि गायकवाड, पो हवा एकाडे, मुकाटे, अंभुरे, पोकाॅ सरकटे यांनी केली.
