Uncategorized

शिरपूर पोलिसांची अवैध्य गुटख्यावर कारवाई

१ लाख २४ हजार आठशेचा मुद्देमाल जप्त

शिरपूर शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चांडस येथे बस स्थानक ते डोणगांव रोडवर एका शटर बंद दुकानात शासनाने प्रतिबंध घातलेला गुटख्याचा माल असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखेडे यांनी, पथक गठीत करून दिनांक ३० ऑगस्ट २०२२ चे रात्री ८ वाजताच्या दरम्यान कारवाई करत तब्बल १ लाख २४ हजार आठशे रुपये किमतीचा विमल पान मसाला व व्ही वन तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई मध्ये पो.नि. सुनील वानखेडे, सपोनि.महादेव भारसाकळे,सपोनि जगदीश बांगर, संतोष पाईकराव, गौरीशंकर तेलंगे, मनोज ब्राम्हण आदींचा सहभाग होता.

सदर जप्त करण्यात आलेला गुटखा हा अक्षय महादेव जिरवणकर याचा असून आरोपी फरार आहे. जप्त केलेला गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आला अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांनी आपल्या परिसरात कुठल्याही प्रकारचे अवैध्य कृत्य, साहित्य असल्यास त्याची माहिती ताबडतोब पोलिसांना द्यावी. – ठाणेदार सुनील वानखेडे

Related Articles

Back to top button
Don`t copy text!