Uncategorized

मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीबाबतच्या

अफवांवर विश्वास ठेवू नका

पोलीस विभागाचे आवाहन

     वाशिम, दि. 19 (जिमाका) :-  समाज माध्यमातून जिल्हयात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी कार्यरत असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. पोलीस विभागाच्यावतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अशाप्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हयात लहान मुलांना पळविण्याची घटना कोठेही घडलेली नाही. लहान मुलांना पळविणारी कोणतीही टोळी जिल्ह्यात कार्यरत नाही. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनअंतर्गत पोलिसांची दिवसाची तसेच रात्रीची गस्त सतत चालू आहे. तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच सर्व शाळा व कॉलेज यांचे मुख्याध्यापक यांनी देखील समाज माध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच अशाप्रकारच्या अफवासुध्दा पसरवू नयेत. असे आवाहन वाशिम पोलीस विभागाने केले आहे.  

Related Articles

Back to top button
Don`t copy text!