Uncategorized

मुंगळा येथे दारू विक्रीच्या प्रमाणात वाढ.

लवकरच युवा पिढी नष्ट होणार…

अनेकाचे या दारू मुळे होत आहेत संसार उध्वस्त.

मुंगळा :

प्रतिनिधी

मुंगळा येथे हातभट्टी दारू व देशी विदेशी रम दारू भर रस्त्यात खुलेआम पणे दुकाने थाटुन दारू विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे अनेक संसार उध्वस्त होत असून यावर प्रतिबंध लावण्यात यावे अशी माता बघीनीची व गावकऱ्यांची मागणी आहे . मुंगळा येथे मागील काही दिवसांपासून दारू काढण्याच्या व रोडवर खुलेआम विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्या मुळे नविन पिढीचे संसार उघडय़ावर पडण्याची भिती निर्माण झाली असून दारू मुळे किती तरी नवीन पिढीचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. आई वडील मुले पत्नी यांच्या समोर जगावे का मरावे आशी परिस्थिती या दारूने निर्माण झाली असून कोणीही माय बहीनीचा वालीच राहीलेला नाही अशी ओरड जनतेतुन ऐकू येत आहे. या खुलेआम दारू विक्री मुळे मुंगळा येथील नागरिक त्रस्त झाले असुन जनतेच्या रक्षणाचा वालीच राहीलेला नाही अशी मुंगळा येथील परिस्थिती निर्माण झाली आहे. यादारू विक्री कडे लक्ष दिले नाही तर थोड्याच दिवसात युवा पिढीचे भविष्य खराब झाल्या शिवाय राहणार नाही मग वेळ गेलेली राहील तरी लवकर गावातील दारू विक्री बंद करण्यात आली नाही तर महीला मंडळीं रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही याची जाणीव प्रशासनाने ठेवावी.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!