Uncategorized

बनावट विदेशी दारू तयार करणा – या वाईनबार मालकाला ठोकल्या बेड्या …

स्था. गु.शाखेची धडक कारवाईत ४.४३ लाख रु.ची बनावटी विदेशी दारू जप्त …

महादेव हरणे /वाशीम
मा . पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह सा यांनी समाजात व्यासनांच्या विख्याळयात अडकवून अनेक कुटुंय दारूच्या व्यसनापाई अनेक जन गुन्हेगारीचा मार्ग अवलंबवितात समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याच राज्य अबाधीत राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असुन कायद्याचे पालन न करणा – या विरोधात सतत् कडक कार्यवाहीचा सपाटा सुरू असुन याच पार्श्वभुमीवर पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण हद्दित खालील प्रमाणे बनावट विदेशी दारू तयार करून विकणा – या बार वर धाड टाकुन लोकांचे जिवीताशी खेळणा – या बार मालकास ठोकल्या बेडया . दिनांक ०२ / ० ९ / २०२२ रोजी सपोनि अतुल मोहनकर यांना गुप्त बादमी दाराकडुन बातमी मिळाली की , वाशिम ने हिंगोली रोडवर पंचाळा फाटा येथील प्रभाकर वानखडे हे त्यांचे मालकीचे आयुष वाईनबारमध्ये हलक्या दर्ज्याचे विदेशी दारू मध्ये स्पिरीट सारखे द्रावण मिसळवुन वेगवेगळ्या कंपनीचे विदेशी बनावट दारू तयार करून ति त्यांच्या बार मध्ये वाहतुक पासवर आलेल्या विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्यामध्ये भरून त्याबनावटी विदेशी विकी करित आहे . ती बनावटी विदेशी दारू प्राशन केल्याने मानवि जिवीतवास व आरोग्यास हानिकारक असते हे माहित असतांना सुध्दा आयुष वाईन बार चे मालक प्रभाकर वानखडे हे बेकायदेशीर विक्री करत आहे अश्या माहिती वरून स्था . गु.शा. वाशिम व राज्य उत्पादन शुल्क वाशिमचे पथक सोबत घेवून संयुक्तरित्या आयुष वाईन बारवर रेड केली असता तेथे वेगवेगळया कंपनीची वेगवेगळया ब्रांडची विदेशी दारू किं ६३९ ३५ /- रूची व देशी दारू लावणी संत्रा ३३६०/- रूची हलक्या दर्ज्याची विदेशी दारू प्लास्टीक बॉटलमध्ये किंमत ३५००/- रू ची उग्रवासाची स्पिरिट किंमत १०००/- रू आणि बनावट विदेशी दारू बनविण्याकरिता उपयोगांत येणारे प्लास्टीकचे झाकण किं १६६०/- रू असा एकुण ४ लाख ४३ हजार ५७९ रु चा माल मिळूण आल्याने पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेवून आयुष बारचे मालक प्रभाकर महादु वानखडे व मुलगा आयुष प्रभाकर वानखडे दोन्ही रा . संतोषीमाता नगर वाशिम यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे अपराध क्रमांक ३२ ९ / २२ कलम ३२८,२७३१८८३४ भादवि सह कलम ६५ ( ई ) . ८१.८३.१०३१०८ मु प्रो . अॅ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कार्यवाही मा पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह , अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांचे • मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव , सपोनि अतुल मोहनकर पोउपनि शब्बीर खान पठाण पोहवा किशोर चिंचोळकर , सुनिल पवार , पोना राजेश राठोड , पोका डिगावर मोरे , चापोको शंखर घोडे व विशाल मोहळे तसेच राज्य उत्पादन शुल्क वाशिमचे निरीक्षक गोपीनाथ पाटील दुयम निरीक्षक किरण बराई , गंजन आडे . नितीन तिडके , ललित खाई स्वनील लांडे यांनी सहभाग नोंदविला आहे .

Related Articles

Back to top button
Don`t copy text!