Uncategorized

पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्याने वृद्धास लुटले!

आरोपी सीसीटीव्हीत कैद


वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरामधील वाशिम ते रिसोड रस्त्यावर असणाऱ्या साबु लेआउट समोर रिसोड तालुक्यातील शेलु खडसे येथील हल्ली मुक्काम शिवाजी वसाहत येथील एका वृद्धाला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांचा हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना दुपारी घडली.रिसोड शहरातील शिवाजी वसाहत भागात राहणारे भाऊराव साहेबराव खडसे हे वाशिम महामार्गाने रिसोड शहरात पायी जात असतांना एका मोटारसायकल वर आलेल्या तिघांनी पोलीस असल्याचं सांगून त्यांच्या हातातील सुमारे 70 हजार किंमतीच्या दोन अंगठ्या काढून पोबारा केला.
ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून रिसोड पोलीस लुटारूचा शोध घेत आहेत.
भर दिवसा वृद्धाला लुटल्याने रिसोड शहरातील नागरिकांमध्ये भिती पसरली असून गुन्हेगारीच्या घटना वाढल्याने रिसोड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उभे राहले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये चोरीचे प्रमाण वाढलं आहे मागील आठवड्यामध्ये पोस्ट ऑफिस मधील तिजोरी व तसेच इतरही अनेक घटना वाढत चालल्या असून यावर नियंत्रण मिळवणे अत्यंत गरजेचे आहे पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने आरोपीचा शोध घ्यावा अशी मागणी यावेळी खडसे यांनी केली आहे.
भर दिवसा अशा घटना घडत असल्याकारणाने रिसोड शहरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्री व दिवसा पेट्रोलिंग करून अशा घटना कशा कमी करता येईल यावर लक्ष देणे गरजेचे आहे असे मागणी शहरातील नागरिक करीत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!