धुऱ्या वर चारण्याच्या कारणावरून कुऱ्हाडीने मारहाण
शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नंधना येथील घटना
शिरपूर :
शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रा.नंधाना तालुका रिसोड येथे शेताच्या धुऱ्यावर म्हैस चारण्याच्या कारणावरून तू आमच्या धुऱ्यावर म्हैस का चारतो असे म्हणत भगवान नारायण बाजड वय ६० वर्ष रा.नंधाना यास भागवत पंढरी बाजड वय ५० रा. नंधाना यांनी दिनांक १८/०८/२०२२ रोजी त्याच्या हातातील कुऱ्हाडीने उजव्या हातावर वार करून जखमी केले. व परत शेताच्या धुऱ्यावर दिसल्यास जीवाने मारून टाकेन अशी धमकी दिली.
फिर्यादी भगवान नारायण बाजड यांनी शिरपूर पोलिसांत फिर्याद दिली कि, ते त्यांचे मालकीची म्हैस चारत असतांना भागवत पंढरी बाजड वय ५० यांनी फिर्यादी भगवान नारायण बाजड व त्याच्या मुलाला माझ्या धुऱ्यावर म्हैस का चारतो असे म्हणत हातातील कुऱ्हाडीने मारहाण केली यामध्ये फिर्यादी च्या उजव्या हाताला जबर मार बसला सदर फिर्यादी नुसार शिरपूर पोलिसांनी आरोपी भागवत पंढरी बाजड यांचे विरुद्ध ३२४,३२३,५०४,५०६,३४ भादवि नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सुनील वानखेडे यांचे मार्गदर्शनाखाली बीट जमादार दामोदर इप्पर हे करित्त आहेत.