आवाजाची मर्यादा पाळा व कोणतेही वाद्य वाजवा- सुनील कुमार पुजारी
शिरपूर पोलीस स्टेशन येथे शांतता समितीच्या सभेचे आयोजन

आवाजाची मर्यादा पाळा व कोणतेही वाद्य वाजवा- सुनील कुमार पुजारी
शिरपूर पोलीस स्टेशन येथे शांतता समितीच्या सभेचे आयोजन
शिरपूर:
आगामी गणेशोत्सव व इतर समारंभाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर पोलीस स्टेशन येथे दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी शांतता समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखेडे यांनी उपस्थित मंडळाच्या सदस्यांना सांगितले की, गावात सध्या जैन धर्मियांचे संत विद्यासागरजी महाराज यांचे वास्तव असल्याने देश भरातून जैन बांधव आलेले असल्याने यावर्षी आपल्याला थोड्या फार प्रमाणात त्यांची काळजी घेत आपले उत्सव साजरे करायचे आहेत. यावेळी बोलताना एस. डी. पी. ओ. पुजारी म्हणले की, सर्वांनी आप आपले धार्मिक उत्सव साजरे करतांना कायद्याचे भान ठेवावे, कुठल्याही प्रकारे इतर धर्मियांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, पारंपरिक मिरवणूक मार्गाने मिरवणूक काढून विसर्जन करावे, विसर्जनाच्या वेळेवर तोडगा काढण्यासाठी १४ गणेश मंडळ व गावातील प्रतिष्ठीत मंडळी यांची विसर्जन समिती स्थापन करण्याचे आदेश स्थानिक ठाणेदार यांना दिले, सुप्रीम कोर्टाचे नियम पाळत कोणतेही वाद्य वाजवू शकता, फक्त डेसीबलची मर्यादा पाळा, रस्त्यावरील खड्डे ग्राप मार्फत बुजवले जावे, रस्त्यावर लोमणारे वीजेचे तार विज वितरण कंपनी द्वारे दुरुस्त व्हावेत, विसर्जन मिरवणूक मार्गावरील तात्पुरते अतिक्रमण काढून घेतले जाणार, शस्त्र प्रदर्शन केले तर भारतीय हत्यार कायद्यानुसार कारवाई केली जाईल, गुलाल व गुलाब पाकळ्याची उधळण करू शकता पण मर्यादेत,पोलीस हे तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आहेत पोलिसांचे कुठलेही बंधन तुमच्यावर येणार नाही. तुम्हाला कुणीही अडवणार नाही. पोलिसांची संख्या अपुरी आहे. १९८० ला जेवढी संख्या होती तेव्हडीच संख्या आजही आहे, पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज आहे. असे यावेळी सांगितले,
यावेळी १४ गणेश मंडळाचे पदाधिकारी, संतोष भालेराव, विजय अंभोरे,संतोष अढागळे, दत्तराव भांदुर्गे, अशोकराव देशमुख,शशिकांत देशमुख कैलास भालेराव,अस्लम पठाण,शाम दीक्षित, गजानन इरतकर, ज्ञानेश्वर गावंडे तसेच तंटामुक्तीचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिरपूर पोलीस स्तेशनच्या कार्माच्यार्यानी प्रयत्न केले.




