शेलूबाजार मध्ये सासू व मेव्हणी ची निर्घून हत्या … परिसरात दहशत….

गावाकडील संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याची चर्चा

वाशिम प्रतिनिधी:
वाशीम:- जिल्हातील शेलुबाजार येथे आज दि.१३ रोजी जावयाने सासू व मेव्हनिची हत्या केल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना घडली
दि . 13 फिर्यादी हे चौकात असतांना लोकानकडून माहिती मिळाली की गं.भा. निर्मलाबाई भीकाजी पवार हीच्या घरासमोर निर्मलाबाईचा छोटा जावाई हा निर्मलाबाई व त्याची मोठी मुलगी विजया यांना मोठा सुराने मारहाण करीत आहे. घटना स्थळी जाऊन पाहीले असता तेथे निर्मलाबाई भिकाजी पवार व तीची मुलगी विजया गुजावळे ह्या दोघीही घरासमोर खाली रक्ताच्या थारोळ्यात जख्मी बेशुध्द अवस्थेत पडलेल्या दीसुन आल्या . तसेच बाजूला त्याचा जावाई सचिन धर्मराज थोरात रा.पुणे हातात मोठा सुरा घेऊन ऊभा होता . सुरा हा रक्ताने माखलेला आसल्याचे दिसून आला. पोलीसाना माहिती देत ताबडतोब निर्मला व विजया यानां 108 रुग्णवाहिके मध्ये प्राथमीक आरोग्या केंद्र शेलूबाजार येथे घेऊन गेलो तेथे वैद्यकीय अधीकारी यांनी वाशिम येथे रेफर करित दोघींनाही सरकारी दवाखाना वाशिम येथे उपचारा साठी नेले असता डॉक्टर यांनी मयत झाल्याचे सांगीतले तरी सचिन धर्मराज थोरात रा. पुणे यानेच निर्मलाबाई भिकाजी पवार व तीची मुलगी विजया गुजांवळे रा जिंतूर यांना मोठा सुरा ने शरीरावर वार करून जिवाने ठार मारले असल्याची माहिती फिर्यादीने दिली .
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार सुनील हुड यांचे मार्गदर्शनात ए.पी.आय. मंजुषा मोरे,ए.एस.आय. अनिरुद्ध भगत, हेकॉ ज्ञानेश्वर राठोड, पोकॉ संदिप खडसे, गोपाल कव्हर,अंकुश मस्के यांनी घटनास्थळ गाठून आरोपीस अटक केली.तसेच आरोपीवर कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय मंजुषा मोरे करीत आहेत.