Uncategorized

शेती नावावर करून घेण्यासाठी चाकूच्या धाकावर ठेवले डांबूनशिरपूर : शेती नाववावर करून मिळावी या साठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या साह्याने चाकूचा धाक दाखवून गाडीत टाकून पळवून नेवून डांबून ठेवल्याची घटना शिरपूर पोलिस स्टेशन अतंर्गत येणाऱ्या वाघी खु. येथे १४ मे रोजी घडली. या प्रकरणी पिडीत व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिस स्टेशन येथे दाखल असल्यानुसार वाघी खु. येथील रहिवाशी श्रीराम राघोजी खरात यांचा त्यांच्या सुने सोबत शेती प्रकरणी वाद असून त्यांचे एकमेकांविरुद्ध प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. श्रीराम खरात यांची सून शेतजमिन नावावर करून देण्यासाठी गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून मारहाण करते. १४ मे रोजी दुपारी अडीच वाजता दरम्यान श्रीराम खरात यांची सून सोनू व मुलगा शिवाजी यांनी त्यांच्या साथीदारासह शेती नावे करून देण्यासाठी श्रीराम खरात यांना चाकूचा धाक दाखवून राहत्या घरासमोरून गाडीत टाकून पळवून नेले. सहा ते सात तास ताब्यात ठेवून नंतर त्यांना मालेगाव येथील पॉवर हाऊसजवळ सोडून दिले. भयभीत झालेल्या श्रीराम खरात यांनी एका दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेत शिरपूर पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी श्रीराम खरात रा. वाघी खु. यांनी १५ मे रोजी रात्रीला शिरपूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी सोनू हिरामन खरात, शिवाजी हिरामन खरात रा. मालेगाव, ज्ञानबा शिवाजी तांगड, संतोष ज्ञानबा तांगड, रा. भेरा, आरती संतोष शिंदे व संतोष रामदास शिंदे या सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये शिरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक शरद साठे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!