मालेगाव शहरात चोरांचा धुमाकूळ…. एकाच रात्रीत चार दुकाने फोडली


मालेगांव/प्रतिनिधी : – मालेगाव येथील 17 मे च्या एकाच रात्रीत् 4 दुकाने फोडल्याचि घटना घ ड ली आहे. मालेगाव येथील विश्रामगृहाशेजारी असलेल्या शरद् पखाले यांच्या गोल्डी बेअर शॉपीच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यात ठेवलेले 10 हजार रुपये रोख व सोबत 11 हजार रुपये किमतीचे 5 ट्यूबर कंपनीचे बीअर बॉक्स चोरून नेले तर
आठवडी बाजारातील गोपाल अग्रवाल यांच्या श्री जीनशक्ती सुपर शॉपीच्या कुलूपाच्या पट्ट्या तोडून चोरट्यांनी दुकानातील ५ हजार रुपये किमतीचे डिव्हीआर पळवले. आठवडी बाजारातीलच कमलकिशोर कासट यांच्या जयलक्ष्मी कापड दुकानाचे शटर उघडत चोरट्यांनी कुलूप तोडून गल्ल्यात ठेवलेल्या रोख 50 हजार रुपयांवर हात साफ केला आहे. शेजारील दिलीप रामकिसन भांगडीया यांच्या शिवकिराणा दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यात ठेवलेले 20 हजार रुपये रोख चोरून नेले आहेत. या घटनेची फिर्याद महेश कमलकिशोर कासट (वय ४५ रा. मालेगाव) यांनी आज सकाळी ९ वाजता मालेगाव पोलीस स्टेशन दिली आहे. वृत्त लिहेपर्यंत शरद पखाले यांनी फिर्याद दिली नव्हती. या घटनेचा प्राथमिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश भगत यांनी केला असून, पुढील तपासाची जबाबदारी पोलीस निरिक्षक किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी प्रदीपकुमार राठोड यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक वानखेडे सह पोलीस सहकाऱ्यांसह मालेगाव शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासनि चालू होती.
भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून घरफोडीची ही घटना त्वरीत सोडवून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.