Uncategorized

धाराशिव मोटार वाहण निरिक्षांची मोठी कारवाई

नियमांचे भंग करनाऱ्या दोन टिप्पर वर ८५ हजाराची दंडात्मक कारवाई .

परंडा प्रतिनिधी सुरेश बागडे

मोटार वाहण नियमांचे भंग करनाऱ्या दोन टिप्पर वर धाराशिव मोटार वाहण निरिक्षक एम जी शेख व श्रीमती पी.एम उपासे यांच्या पथकाने दि १४ मे रोजी टिप्पर मालका कडून ८५ हजार रूपयाचा दंड वसुल केला आहे .

परंडा कुर्डवाडी रोडवरील
वागेगव्हाण शिवारात टिप्पर क्रमांक एम एच ४५ -१२५६ व टिप्पर क्रमांक एम एच ४५- १२५७ हे दोन टिप्पर मुरुमाची वाहतूक करीत होते .

मोटार वाहण निरिक्षक शेख व उपासे यांच्या पथकाने वाहन तपासणी केली असता एका टिप्पर चे इंन्शुसन्स ची व परमेट ची मुदत संपली असल्याचे तपासणी मध्ये दिसुन आल्याने दोन्ही टिप्पर चे वजन करून परंडा बस आगारात लावण्यात आले .
एका टिप्पर मध्ये ओव्हर लोड असल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली .

परंडा तालूक्यात विना परवाना मुरूम वाहतूक होत असुन महसुल विभागाचे दुर्लक्ष होत आहे .

सदरील मुरूम परंडा तालूक्यातील वागेगव्हाण येथील रस्ता कामासाठी
टाकण्यात येत असल्याची माहिती टिप्पर चालक यांनी दिली आहे .

Related Articles

Back to top button
Don`t copy text!