गतिरोधकवरुन दुचाकी उसळल्याने अपघात
कारंजा ■ गतिरोधकवरून दूचाकी उसळल्याने घडलेल्या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ मे ला कांरजा मंगरूळपीर मार्गावरील शोभनाताई चवरे शाळेजवळ घडली. डॉ निलेश हेडा व नवल देशमुख असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे असुन दोघेही कांरजा येथील रहीवासी आहेत.
कांरजा शहरातुन घराकडे दुचाकीने जात असताना मार्गातील शोभनाताई चवरे शाळेजवळील गतिरोधकावरून त्यांची दुचाकी उसळुन दुचाकीसह ते खाली पडले, त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली . अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच रूग्णवाहीका चालक अजय घोडेस्वार व विधाता चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेउन जखमींना कारंजा उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बाहेर गावी पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रांणी दिली आहे. दरम्यान अपघाताच्या पोलिसातील नोंदीबाबत मात्र माहिती मिळाली नाही.