previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

मनाचिये वारी : ‘चित्ती असू द्यावे समाधान’

जसजसे पंढरपूर समीप येते, तसतसा वारकऱ्यांच्या सकाळी वाटचालीत माऊलीभक्त कुंभारगावकर यांचे समाधी मंदिर लागते. तेथे सोहळा थांबतो. कुंभारगावकर म्हणजे निष्ठावान वारकरी. वारीत चालताना त्यांनी देह ठेवला. त्यावेळी त्यांच्यावर पालखी मार्गालगतच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे तेथेच मंदिर उभारण्यात आले. तेथे माऊलींच्या पालखीचा सकाळचा विसावा असतो. पालखी थांबली की कुंभारगावकरांच्या वतीने कीर्तन होते. येथे देण्यात येणारा आमटी आणि भाकरीच्या न्याहारीचा बेत भारीच असतो. गतवर्षी आणि यंदाही वारी आली नाही. मात्र, आज कुंभारगावकर यांनी आपल्या राहत्या घरी परंपरेचे कीर्तन केले आणि काही वारकऱ्यांना आमटी-भाकरी खाऊ घातली.

Also Read: थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया सुरू

त्यातून त्यांनी माऊलींवरील आपली श्रद्धा व्यक्त केली. कोरोनामुळे वारीला जाता आले नसल्याने वारकऱ्यांची अवस्था अशीच आहे. मात्र, नकारात्मक विचार करीत बसण्यापेक्षा नामस्मरण करून सकारात्मक भाव निर्माण करण्याची गरज आहे. नातेपुते परिसरातील भाविकांना माऊलींच्या सहवासाची जाणीव अधिक प्रकर्षाने जाणवत असणार. कारण गावोगावी वारीचे वातावरण असते. त्यामुळे सर्वांनाच चुकल्यासारखे वाटत असणार. वारकरी असो वा ग्रामस्थ साऱ्यांचीच अवस्था सारखीच आहे. पण, सध्याच्या वातावरणात संतांनी सांगितलेला ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ हाच पर्यायी मार्ग सापडतो.

गेल्या दोन वर्षांपासून माऊलींचा सोहळा आला नाही, याचे दुःख होत आहे. नातेपुते तीन जिल्ह्यांच्या हद्दीवर असल्याने इतर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. अन्नदानरुपी सेवा करण्यावर गावकऱ्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोनाचे संकट लवकर जावे आणि पुढील वर्षी त्याच वैभवात माऊलींचे स्वागत करायला मिळावे, हीच प्रार्थना आम्ही करतो.

– शहाजीराव ऊर्फ बाबाराजे देशमुख, माजी उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा परिषद


Source link

editor-in-chief

editor-in-chief and Owner ADITYA B.MANE - 8308444934 active पोलीस टाईम्स - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activepolicetimes.in या क्राईम न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active पोलीस टाईम्स चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active police times या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .