previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

आईने वाचवले आपल्या लेकराला, किडनी देऊन दिले बळ

आईने स्वतःची किडनी मुलाला देत ‘आई मायेचा सागर’ असतो, हे दाखवून दिले आहे.

परळी वैजनाथ (जि.बीड) : शहरातील Parli Vaijinath माणिकनगर भागातील रहिवासी असलेल्या एका आईने आपल्या मुलाला किडनी देऊन त्याचे प्राण वाचवले आहेत. या शस्त्रक्रियेसाठी त्यांना नाथ प्रतिष्ठानकडून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली. शहरातील एका आईने स्वतःची किडनी मुलाला देत ‘आई मायेचा सागर’ असतो, हे दाखवून दिले आहे. तसेच किडनी रोपणच्या शस्त्रक्रियेसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन लाखांची मदत करत माय-लेकरांच्या जगण्याला बळ दिले आहे. शहरातील माणिकनगर येथील रहिवासी स्वानंद श्रीधर बोकन (वय २९) हे २०१६ पासून किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांची किडनी निकामी झाली असून त्यांनी पुणे येथे उपचार घेतले. दरम्यान त्यांना किडनीची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर आई शकुंतला श्रीधर बोकन (वय ५०) यांनी आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला. यानंतर औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये किडनी रोपणची शस्त्रक्रिया डॉ. श्रीगणेश बर्मेला, डॉ. अजय महाजन, डॉ. अरूण चिंचोले यांनी यशस्वी केली. त्यांच्यासमोर या शस्त्रक्रियेसाठी खर्चाची चिंता होती. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन लाख रुपये देऊ केले.beed live news mother donate her kidney to son in parli vaijinath tahsil

Also Read: Aurangabad : औरंगाबादेत कोरोना लसींचा साठा संपला

ही रक्कम शुक्रवारी (ता.२५) नगरपालिकेचे गटनेते वाल्मिक कराड यांच्या हस्ते बोकन यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत, बोकन कुटुंबीयांना धीर दिला. स्वानंद आणि त्यांची आईची प्रकृती ठणठणीत असून स्वानंद यांना दीड वर्षाची एक मुलगी आहे.


Source link

editor-in-chief

editor-in-chief and Owner ADITYA B.MANE - 8308444934 active पोलीस टाईम्स - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activepolicetimes.in या क्राईम न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active पोलीस टाईम्स चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active police times या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .