previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

बुद्धू रेघीवाले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

वाशिम : ( दि. 3 जून ) तालुक्यातील सुरकंडी बू. या छोट्याशा गावातील रहिवासी असलेले व सध्या वाशिम येथील पोलीस विभागात जिल्हा वाहतूक शाखेत कार्यरत असलेले बुद्धू चंदू रेघीवाले यांची 2013 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने पदोन्नतीसाठी झालेल्या परीक्षेत पात्र ठरल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक ( पी एस आय ) पदी निवड झाली आहे. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या 31 मे 2021 च्या आदेशान्वये त्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे .
बुद्धू भाई रेघीवाले हे तालुक्यातील सुरकंडी बू. येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना बालपणापासूनच कुस्ती या खेळाची आवड होती. पुढे कुस्तीमध्ये ते पारंगत झाले आणि कुस्तीगीर म्हणून त्यांनी अनेक मैदाने गाजविली. अनेक पुरस्कार पटकाविलेत. कुस्तीमध्ये त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर लौकिक होता. पुढे ते सण 1989 साली पोलीस विभागात रुजू झाले. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील पोलीस स्टेशन मध्ये त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती. त्यानंतर त्यांनी शेगाव, मानोरा, अनसिंग येथील पोलीस स्टेशनमध्ये आपले कर्तव्य बजाविले. त्यानंतर एलसीबी विभागात व सध्या जिल्हा वाहतूक शाखेत ते कार्यरत आहेत.
खातेनिहाय पदोन्नती बाबत महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2013 मध्ये पार पडलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी रेघीवाले यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी नुकतीच पोलीस महासंचालक यांनी जाहीर केली आहे. यामध्ये रेघीवाले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. अमरावती परीक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना सेवा देण्याची संधी मिळणार आहे. यावर्षी त्यांनी वयाच्या 52 व्या वर्षात पदार्पण केले आहे. आजपर्यंतच्या सेवाकाळात त्यांनी आपले चोख कर्तव्य बजावत आपली सेवा दिली आहे. पदोन्नती मुळे पीएसआय पदी मिळालेल्या बढतीमुळे आणखी चांगल्या पद्धतीने सेवा देऊन ” सद्रक्षणाय , खलनिग्रहनाय” या ब्रीदवाक्यानुसार आपले कर्तव्य चोखपणे बजाविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबाबत परिसरात त्यांचे विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनात गावातील व परिसरातील शेकडो युवक पोलिस प्रशासनासह सैन्यात भरती होण्यासाठी तयारी करत असतात. तर आजतागायत शेकडो युवक पोलीस सेवेसह सैन्यात निवड होवून सेवा देत आहेत.

editor-in-chief

editor-in-chief and Owner ADITYA B.MANE - 8308444934 active पोलीस टाईम्स - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activepolicetimes.in या क्राईम न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active पोलीस टाईम्स चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active police times या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .