previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

गुणनिश्‍चितीसाठी दहावी-बारावीच्या शिक्षकांची शाळेत उपस्‍थिती बंधनकारक

सातारा : शाळा, महाविद्यालयांतर्गत (School-College) गुणनिश्‍चिती करण्‍याचे काम सुरू असल्‍याने इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्‍यासाठी या इयत्तांना शिकवणाऱ्या सर्वच शिक्षकांना (Teacher) उपस्‍थित राहण्‍याचे आदेश शिक्षण विभागाने (Department of Education) दिले आहेत. याच आदेशात इतर इयत्तांच्‍या शिक्षकांना ५० टक्के उपस्‍थितीचे बंधन घालण्‍यात आले आहे. (Attendance At School Is Mandatory for 10th And 12th Class Teachers Satara Education News)

कोरोनाचा फैलाव रोखण्‍यासाठी राबविलेल्‍या उपाययोजनांनुसार शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्‍यात आली होती.

कोरोनाचा (Coronavirus) फैलाव रोखण्‍यासाठी राबविलेल्‍या उपाययोजनांनुसार शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्‍यात आली होती. शाळा, महाविद्यालये बंद ठेवत असतानाच शैक्षणिक अभ्‍यासक्रम ऑनलाइन (Online Education) पद्धतीने पूर्ण करून घेण्‍याचे आदेशदेखील शासनाने दिले होते. त्यानुसार ऑनलाइन अभ्‍यासक्रम पूर्ण करत शाळा, महाविद्यालयांनी दहावी, बारावी सोडून इतर वर्गांची निकालपत्रे तयार केली आहेत.

Also Read: सावधान! तिसऱ्या लाटेबाबत धोक्याची घंटा; जावळीत 13 मुलांना कोरोनाची लागण

दहावी, बारावीच्‍या निकालासाठीचे गुणनिश्‍चिती धोरण जाहीर झाल्‍यानंतर अंतर्गत गुणदान प्रक्रिया सध्‍या शाळा, महाविद्यालय स्‍तरावर सुरू आहे. हे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करायचे असल्‍याने या इयत्तांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना, तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्‍थित राहण्‍याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. याच आदेशात इतर इयत्तांना शिकवणाऱ्या शिक्षकांची ५० टक्के हजेरी अनिवार्य ठरवली आहे. शाळेतील उपस्‍थितीचे नियम पाळत असतानाच त्‍याचा परिणाम ऑनलाइन अभ्‍यासक्रम घेण्‍यावर होणार नाही, याची दक्षता घेण्‍याच्‍या सूचनाही शिक्षण विभागाने आदेशात दिल्‍या आहेत.

Attendance At School Is Mandatory for 10th And 12th Class Teachers Satara Education News


Source link

editor-in-chief

editor-in-chief and Owner ADITYA B.MANE - 8308444934 active पोलीस टाईम्स - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activepolicetimes.in या क्राईम न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active पोलीस टाईम्स चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active police times या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .