previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

सामान्यांवर चालणारा दंडुका अवैद्य धंद्यांवर कधी चालणार?

जऊळका /मालेगाव, दि. १८ (प्रतिनिधी)

_____________________________

गतवर्षीपासून कोरोनामुळे अनेक उद्योग, व्यवसाय व रोजगार प्रभावित झाले असून राज्यासह वाशीम जिल्ह्यात कडक निर्बंध व संचारबंदी सुरू आहे. यामुळे गोरगरिबांसह सर्वसामान्यांचे जीवन जगणे मोठे जिकरीचे झाले आहे. सध्याच्या संचाबंदीच्या काळात दोन वेळची पोटाची खळगी भरण्यासाठी काही रोजगार, वाहचालक, मजुर नाईलाजाने घराबाहेर पडतात. अशा सर्वसामान्यांवर जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार आजिनाथ मोरे व त्यांचे पोलीस कर्मचारी दंडुका चालवित आहेत. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाच सर्वसामान्यांवर चालणारा दंडुका अवैध धंद्यांवर कधी चालणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी यापूर्वीच जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना गोरगरीब सर्वसामान्यांवर बळाचा वापर करु नये, अशा सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी ठाणेदार त्याचे पालन सुद्धा करीत आहेत. मात्र जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार आजिनाथ मोरे हे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेला न जुमानता गोरगरिबांवर बळाचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे जऊळका पोलीस स्टेशन हद्दीत जुगार, गावठी दारू, गुटखा, अवैधपणे पेट्रोल, डिझल विक्री यासह इतर अवैध धंदे सुरु आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यांना अर्थपूर्ण संरक्षण देण्याचे काम पोलिसांकडून होत असल्याचया आरोप नागरिकांमधून केला जात आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजास्तव घराच्या बाहेर पडणाऱ्यांवर दंडुका चालविण्यापेक्षा अवैध धंदे करणाऱ्यांवर दंडुका चालविण्यावर भर द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांची आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांना विनाकारण मनुष्यबळाचा वापर न करण्याचे आदेश दिले होते तरीसुद्धा जऊळका पोलिसांनी त्या आदेशाला बगल दिली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक याप्रकरणी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागुन आहे.

editor-in-chief

editor-in-chief and Owner ADITYA B.MANE - 8308444934 active पोलीस टाईम्स - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activepolicetimes.in या क्राईम न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active पोलीस टाईम्स चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active police times या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .