Uncategorized

गवत कापण्याच्या वादातून गेला तरुणाचा बळी

क्टिव्ह पोलीस टाइम्स
प्रतिनिधी:- श्रीकांत आडके
कोल्हापूर
मो नं:-9130912121
दिनांक:-10/09/2020

कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावरील कुरुकली (ता.करवीर) येथे भोगावती महाविद्यालयाच्या रस्त्यावर गवत कापण्याच्या वादातून धारदार कोयत्याने तरुणाचा खून झाला. किशोर साताप्पा पाटील (रा. कुरुकली ता. करवीर) असे मयताचे नाव आहे.गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
गवत कापण्याच्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.गेल्याच महिन्यात उपवडे येथेही गवताच्या चार पेंढ्यावरून एका तरुणाचा असाच बळी गेला आहे गुरुवारी घडलेल्या घटनेतील खूनी हल्ला करणारा संशयित किरण हिंदूराव पाटील (रा. कुरुकली, ता. करवीर) हा स्वत:हून इस्पुर्ली पोलिस ठाण्यात हजर झाला. संशयित किरण आणि मयत किशोर यांच्यात हत्ती गवत कापण्यावरुन वाद झाल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली. दोघेही कुरुकली गावचे आहेत. घटनास्थळावरील दृश्य थरकाप उडवणारे होते. मयत किशोर यांच्या मानेवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वर्मी घाव बसले असल्याने त्याचा मृतदेह रक्ताने माखला होता. घटनास्थळी करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर, हवालदार के.डी. माने यांच्यासह पोलिस दाखल झाले आहेत.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active पोलीस टाईम्स - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activepolicetimes.in या क्राईम न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active पोलीस टाईम्स चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active police times या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close