Uncategorized

(शिरपूर जैन) मोटार सायकल अपघातात युवक जागीच ठार;

शिरपूर मालेगांव रोड वरील घटना

प्रतिनिधी (किशोर देशमुख)

शिरपूर जैन ते मालेगांव रोड वर केळी फाटा नजीक मोटार सायकल क्र. MH-37- N-7975 चा गंभीर अपघात होवून मोटार सायकल वरील शेख नजीर हा मोटारसायकल सह रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोठ मोठ्या दगडांवर आदळला या अपघातामध्ये मोटारसायकल वरील शेख नजिर शेख मुसाभाई वय २१ रा. घाटा हा जागीच ठार झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी आहे.

सविस्तर असे कि, शिरपूर जैन येथून जवळच असलेल्या ग्राम घाटा येथील रहिवासी असलेला शेख नजिर शेख मुसाभाई हा पत्नी नाजमीन परवीन हिला घेवून तिच्या माहेरी राजाकिन्ही येथे जात असतांना शिरपूर ते मालेगांव रोड वर शिरपूर पासून ५ कि.मी अंतरावर केळी फाटा जवळ सदर मोटार सायकल चा अपघात झाला.रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या दगडावर शेख नजिर याचा मृत देह आढळून आला .

तर नाजीरची पत्नी नाजमीन परवीन हिला जखमी अवस्थेत उपचाराकरिता रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांनी दिलेल्या माहिती नुसार त्यांच्या मोटार सायकल ला कुण्यातरी पांढऱ्या रंगाच्या वाहनाने धक्का दिला असल्याची माहिती आहे. तर शेख नजिर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

अपघातस्थळ मालेगांव पोलीस स्टेशन हद्दीत असून पुढील तपास मालेगांव पोलीस करीत आहेत.

अपघात ग्रस्त युवकाचे लग्न १ महिन्यापूर्वीच झाले असल्याने शिरपूर येथील त्यांच्या नातेवाईकाकडून सांगण्यात आले तर या अपघाती मृत्यूने ग्राम घाटा व राजकीन्ही येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.   

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active पोलीस टाईम्स - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activepolicetimes.in या क्राईम न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active पोलीस टाईम्स चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active police times या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close