Uncategorized

मिरज शहरातील भोंदू महाराज संतोष शिंदे सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात

अॅक्टीव न्युज / मिरज तालुका
प्रतिनिधी – नितिन पाटील,समडोळी
मो.नं. – ९८६०२३७१०८
दिनांक – १४/८/२०२०

अबब-:
सांगली व मिरज भागामध्ये सामान्य व गोरगरिब लोकांना फसविणे,अशिक्षित लोकांचा फायदा घेवून करणी,भूत काढणे,भाणामती काढणे व जादूटोणा करुन ज्यादा पैसे मिळवून देतो अशा प्रकारचे अमिष दाखवून लोकांची फसवणूक करत असल्याची बातमी मिळताच सांगली शहरामध्ये पत्रकार व पोलिसांनी संगनमताने सापळा रचून तोतयागिरी करणा-या भोंदू महाराज संतोष शिंदे यास अटक केली.
मिळालेली माहिती अशी की,सांगली शहर पोलिसांनी व पत्रकारांनी या भोंदू महाराजाची खातरजमा करण्यासाठी त्या तोतयागिरी करणा-या भोंदू महाराजास सांगली येथील राजवाडा चौकात बोलवून त्या पत्रकारास पिडीत व्यक्ती बनवून पाठवून दिले.पत्रकारास पाठवून दिलेनंतर मिळालेल्या बातमीची खात्री झालेनंतर सापळा लावून बसलेल्या सांगली शहर पोलिसांनी भोंदू महाराजास ताब्यात घेवून चौकशी केली.
त्याच्याकडे चौकशी करताना त्यांचे नांव संतोष नागनाथ शिंदे रा.विद्यानगर मिरज असून लोकांची करणी काढतो.मी पुजा करण्यासाठी येथे आलो आहे असे सांगितले.ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून लाल रंगाची कापडी पिशवी,लाल कापडात कुंकवाने भरलेले लिंबू,देवी देवतांचे फोटो,डायरी,मोटार सायकल व रोख रक्कम असा ऐवज जप्त करण्यात आले, सदरील हे सर्व वस्तु करणी,भाणामती काढणेस वापरत असल्याने त्या भोंदू महाराजाच्या विरुध्द अनिष्ठप्रथा,जादूटोणा,नरबळी यांना प्रतिबंध करणे व त्याचे समुळ उच्चाठण करण्याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करणेत आला आहे.
सदरची कारवाई सांगली शहर पोलिस ठाणेचे पोलिस निरिक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शाखाली स.पो.नि. निलेश बागाव व त्यांच्या सहकारी टिमने केली.
सांगली व इतर भागात अशा भोंदू महाराज अगर फसवणूक करणारे लोक आपल्या परिसरात असतील तर पोलिस प्रशासनास कळविणेचे आव्हान सांगली पोलिस ठाणेचे निरिक्षक अजय सिंकर यांनी केले आहे.

नितिन पाटील,मिरज तालुका

Tags

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active पोलीस टाईम्स - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activepolicetimes.in या क्राईम न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active पोलीस टाईम्स चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active police times या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close